सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

मुखवटे जपलेले !



चेहऱ्यास भावलेले अन जनास दावलेले
मुखवटे कैक माझे.. मी मनात जपलेले 

हर एक मंचावरी मी ..जे घाव मांडलेले 
लपवून चेहरा माझा ..मी डाव साधलेले 
ताकास जावूनीही मी ....भांडे लपवलेले 
मुद्रेवरी जिव्हाळे अन मी शब्द जोखलेले

लोकात भाव माझे ..जे दणकून वाढलेले
फसवच बहाणे सारे ...मी ठाम ठोकलेले
उजेडात राहतो मी ...पण मन अंधारलेले
अंतरातले दीप ..माझे मीच विझवलेले

...तुषार नातू !

लव्ह जिहाद ?????



लव्ह जिहाद की छुपा आतंकवाद 
प्रेमाच्या वेषात धार्मिक छळवाद 
निरागसतेचा...घोर विश्वासघात

धार्मिक अतिरेक गलिच्छ उन्माद 
धर्मयुद्धाचाच भेकड पलायनवाद 
धर्मनिरपेक्षतेचा मोठाच विसंवाद 

...तुषार नातू !

विकले इमान त्यांनी

विकले इमान त्यांनी.. नेहमीच पैश्यासाठी 
पसरलेले हात त्यांचे... दावेदारी पैश्यांसाठी 

मनात त्यांच्या लबाडी. भलतीच पैश्यांसाठी 
जनात दावे मोठे मात्र ..करामती पैश्यांसाठी 
कपडे पांढरेशुभ्र त्यांचे कृष्णकृत्ये पैश्यांसाठी 
घेती शपथा खोट्या .भीष्मप्रतिज्ञा पैश्यांसाठी 

उसने हसू मुद्रेवरी ते .कुटील कामे पैश्यांसाठी
सेवेचे नाटक त्यांचे उठाठेव सगळी पैश्यांसाठी 
आभाळभर अतृप्ती त्यांची तगमग पैश्यासाठी
नातीगोती सोयरे सारे.... .जमवले पैश्यांसाठी

.....तुषार नातू !

निरागसता हरवली मी !



निरागसता हरवली मी ..जगण्याच्या धबडग्यात
व्यवहार सांभाळुनी मी ..बेरकी ठरलो बहुरुप्यात 
लपवूनी छिन्न चेहरा मी .जगतो अमर भ्रमात

खरी ओळख माझी मी .शोधत असतो आरश्यात 
नेहमीच दंग राहतो मी ...माझेच प्रेत सजवण्यात 
तिरडीचे खांदेकरी मी ..बदलत जातो क्षणाक्षणात 

तुषार नातू !

अंधारग्रस्त !



अवस्थ..उदास ..भकास ...हुरहूर 
गोठलेली गात्रे .ओबडधोबड वाटा 
क्षीण कातरवेळ ..तू दुर्गम्य दूरदूर 

अजस्त्र छाया भूतकाळाची गस्त 
निद्रेचे जाळे पोखरलेले..विरलेले 
भयाण भविष्य....वर्तमान ग्रस्त 

जाणिवांचा वणवा..वांझ आक्रोश
तीक्ष्ण वेदना स्वप्नांच्या समिधा
डिप्रेशनची लक्षणे हवा आहे होश

...तुषार नातू !