शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

अस्मितेची गोची !


शेवटी हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे
असे म्हणत त्याने मला गोंधळात टाकले
जात .धर्म ..भाषा.. वगैरेंचे दाखलेही दिले
महापुरुषांची नावे घेत भावनाप्रधान केले
मग ..निर्बुद्ध..समर्थकांकडे विजयाने पहिले
जमीनजुमला..पैसा ..शिक्षणसंस्था यांचा
आत्मविश्वास त्याच्यात ओसंडून भरलेला
सत्तेचा माज..त्याच्या अंगोपांगी बहरलेला
मी निशब्द ..मजबूर ..चौकटीतच जगणारा
तो..विलासी..उन्मत्त ..खुर्चीला चिकटणारा
माझे मत तुम्हाला म्हणत पिच्छा सोडवला
चौखूर विजयी मुद्रेने तांडा मग पुढे सरकला
चौकात रोजगाराच्या आशेने जमणारे मजूर
देशभर पसरलेला झोपडपट्ट्यांचा व्हायरस
दलालांच्या विळख्यात सापडलेला शेतकरी
धर्मस्थळांसमोर बसलेला भिकारी जमाव
अखंड घुसमटलेले....सुशिक्षित बेरोजगार
ओसंडून वाहणारे देशी दारूचे.बेभान अड्डे
अस्मितेच्या शोधात मी सर्वदूर भटकलो
दमलो ..थकलो.. हताश मुद्रेने घरी परतलो
तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा