सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

साकार -सगुण---निराकार निर्गुण !


भव्य -दिव्य....साक्षात -मूर्तिमंत
मंगल -तेजोमय..आभा -प्रकाशवंत
शस्त्रे-अस्त्रे ..करुणामय - उदात्त 
प्रेम -स्नेह ....कृपाघन -धीरोदत्त
दयाळू -मायाळू ..सर्वसाक्षी भगवंत
भीषण -रौद्र ....भयाण -निघृण
विनाशी -संहारक ..कठोर-पाषाण
सडके -कुजके ....पाशवी-अमानवी
किळसवाणे-दुर्गंधी..भेसूर-नग्न
छिन्न-भग्न ...सर्वव्यापी भगवंत
नैतिक-अनैतिक..सुविचारी कुविचारी
सनातनी -पुरोगामी ..धार्मिक-नास्तिक
वैदिक -अवैदिक ..भौतिक-आत्मिक
लौकिक -ऐहिक ...पारलौकिक
सर्वांच्या पलीकडे ..निरंतर शोध
वैश्विक वास्तवाचे निसटते भान
पुराणांचा धांडोळा..इतिहास खनन
शब्दजाल -शब्दच्छल ..
बौद्धिक मैथुन
मानवाचे !
...तुषार नातू !

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

एक विरुद्ध पाच .

एक विरुद्ध पाच ..सहा ..सात..आठ !
एक विरुद्ध पाच ..सहा ..सात ..आठ ..
शेवटी पडलीय कर्मयोग्याशी....गाठ
राहिली पाहिजे मान.. ..आपली ताठ 
भले करूयात एकमेकांशी...सांठ्गाठ
मागून ..हिसकावून ..ओरबाडून घेवू
अस्मिता .स्वाभिमान..पणाला लावू
जुने वैर विसरून ..सारेच एकत्र येवू
वेळ पडली तर थोडे... शिवराळ होऊ
अस्तित्वच आपले...,पणाला लागले
पराभवाच्या शंकेने ..काजवे चमकले
जनमनावरचे राज्य ..धूसर होत गेले
चवताळले सगळे...वैफल्यग्रस्त चेले
..तुषार नातू !

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

जातीसाठी माती !

प्रगती ..विकास..यांची समीकरणे संपली 
नेते मंडळी ....जाती -पातींवरच घसरली
लबाड उमेदवारांचे भ्रष्ट इतिहास विसरली 
जातींचे गणित प्रचारसभेत मांडू लागली
जातीसाठी माती खायची भाषा सुरु झाली
प्रांतवादाची ठिणगी ..पुन्हा चेतवली गेली
आपला परकाची विषवल्ली मनात पेरली
घराणेशाही पुढे लोकशाही.. हतबल झाली
झुंडशाही ..गुंडशाहीला शेवटी शरण गेली
मत्त कौरवसभेत असहाय द्रौपदी झाली
तुषार नातू !
U

सत्तेची संगीत खुर्ची !

कमळावर बसून म्हणे...घरी लक्ष्मी येणार 
घरी दारी ..झोपडपट्टीत.. मस्त चकाकणार
प्रत्येक डोक्यावर येईल का .हक्काचे छप्पर
स्वप्ने मोठी ...जरी लागली नेत्यांना घरघर
जीर्णशीर्ण विरलेली जरी धनुष्याची प्रत्यंचा
टणत्कार तिचा तुमच्या.. उंचावेल आकांक्षा
सर्व मराठी माणसांचा घेतलाय आम्ही ठेका
दुधारी लेखणीचा बाण..सोडणार नाही हेका
पंजा झाला गंजा..फाटकी पतंग बोथट दोरा
पिढ्यांचा मक्तेदारीला..अजूनही मोठा तोरा
खावो और खाने दो....नेहमीचेच यांचे धोरण
कसे लागणार हो यंदा.....दारी सत्तेचे तोरण
घड्याळाचे काटे..यंदा बाराचीच वेळ दिसणार
खाल्लेला पैसा निवडणुकीत ओकून टाकणार
महाराष्ट्रवादी नेहमीचे..खुर्चीच्याच जवळपास
जिंकून कोणीही येवो आम्ही त्याच्या आसपास
बिन रुळाचे रेल्वे इंजिन ..कुठवर पुढे जाणार
मोठ्याने शिट्या मारत...यार्डातच रेंगाळणार
नवनिर्माणाची ब्लूप्रिंट.जनतेला पडला संभ्रम
तिखट जीभ ..वचने..भाषणात मोहक विभ्रम
छोट्या छोट्या पक्षांची झालीय मोठी धावपळ
प्रत्येकाने टाकलाय आमदार होण्यासाठी गळ
अपक्ष .. बंडखोर ..उगाचाच नाचायला लागले
फुटीचा फायदा घेवू म्हणत ..बाशिंगही बांधले
....तुषार नातू !

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

युती ..आघाडी !


युतीला गती ...नेत्यांची अधोगती
सत्तेचे चांदणे .स्वार्थी झाली मती
आत्मसन्मानाच्या निरर्थक बाता 
कार्यकर्ते अधीर नेते झाडती लाथा
आघाडीची गाडी भ्रष्टाचाराची गोडी
लवकर व्हावी तोडी दिल्लीला शिडी
टोल टोलवाटोलवी सत्ता मात्र हवी
फायलींचे जळीत व जनता वाळीत
..तुषार नातू

अस्मितेची गोची !


शेवटी हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे
असे म्हणत त्याने मला गोंधळात टाकले
जात .धर्म ..भाषा.. वगैरेंचे दाखलेही दिले
महापुरुषांची नावे घेत भावनाप्रधान केले
मग ..निर्बुद्ध..समर्थकांकडे विजयाने पहिले
जमीनजुमला..पैसा ..शिक्षणसंस्था यांचा
आत्मविश्वास त्याच्यात ओसंडून भरलेला
सत्तेचा माज..त्याच्या अंगोपांगी बहरलेला
मी निशब्द ..मजबूर ..चौकटीतच जगणारा
तो..विलासी..उन्मत्त ..खुर्चीला चिकटणारा
माझे मत तुम्हाला म्हणत पिच्छा सोडवला
चौखूर विजयी मुद्रेने तांडा मग पुढे सरकला
चौकात रोजगाराच्या आशेने जमणारे मजूर
देशभर पसरलेला झोपडपट्ट्यांचा व्हायरस
दलालांच्या विळख्यात सापडलेला शेतकरी
धर्मस्थळांसमोर बसलेला भिकारी जमाव
अखंड घुसमटलेले....सुशिक्षित बेरोजगार
ओसंडून वाहणारे देशी दारूचे.बेभान अड्डे
अस्मितेच्या शोधात मी सर्वदूर भटकलो
दमलो ..थकलो.. हताश मुद्रेने घरी परतलो
तुषार नातू !

चलनी नाणी !


शिवाजी महाराज ..शाहू ..फुले .आंबेडकर
ही नाणी निवडणुकीत चलनी बनली आहेत
भ्रष्टाचारी ..गुंड ..अशी राजकीय मंडळी 
या नावांमागे आता सर्रास लपलेली आहेत
जनतेला भूलथापा ..मोठे जाहीरनामे देवून
आमदारकी ..मंत्रीपद .. सत्तेची भूल पडली आहे
विकासाचा नावाने दांभिक राजकीय नेत्यांनी
स्वताच्या पिढ्यांच्या उद्धाराची तयारी केली आहे
..तुषार नातू !