गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

सत्तेची संगीत खुर्ची !

कमळावर बसून म्हणे...घरी लक्ष्मी येणार 
घरी दारी ..झोपडपट्टीत.. मस्त चकाकणार
प्रत्येक डोक्यावर येईल का .हक्काचे छप्पर
स्वप्ने मोठी ...जरी लागली नेत्यांना घरघर
जीर्णशीर्ण विरलेली जरी धनुष्याची प्रत्यंचा
टणत्कार तिचा तुमच्या.. उंचावेल आकांक्षा
सर्व मराठी माणसांचा घेतलाय आम्ही ठेका
दुधारी लेखणीचा बाण..सोडणार नाही हेका
पंजा झाला गंजा..फाटकी पतंग बोथट दोरा
पिढ्यांचा मक्तेदारीला..अजूनही मोठा तोरा
खावो और खाने दो....नेहमीचेच यांचे धोरण
कसे लागणार हो यंदा.....दारी सत्तेचे तोरण
घड्याळाचे काटे..यंदा बाराचीच वेळ दिसणार
खाल्लेला पैसा निवडणुकीत ओकून टाकणार
महाराष्ट्रवादी नेहमीचे..खुर्चीच्याच जवळपास
जिंकून कोणीही येवो आम्ही त्याच्या आसपास
बिन रुळाचे रेल्वे इंजिन ..कुठवर पुढे जाणार
मोठ्याने शिट्या मारत...यार्डातच रेंगाळणार
नवनिर्माणाची ब्लूप्रिंट.जनतेला पडला संभ्रम
तिखट जीभ ..वचने..भाषणात मोहक विभ्रम
छोट्या छोट्या पक्षांची झालीय मोठी धावपळ
प्रत्येकाने टाकलाय आमदार होण्यासाठी गळ
अपक्ष .. बंडखोर ..उगाचाच नाचायला लागले
फुटीचा फायदा घेवू म्हणत ..बाशिंगही बांधले
....तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा