मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

छांये हो आप !



इस कदर तेजी से आये हो ' आप '
दिलोंपे छाये हो ..मन मे समाये हो 
बन गये हो सब नेताओ के ' बाप '

अंधेरेमे भविष्य दिखाये हो 'आप '
बिजली की चमक को ..पानी की 
धारोंको लगाया था किसीने 'श्राप '

भ्रष्टाचारसे जबभी भिडोगे 'आप '
संभालकर देखना ..जमकर रखना
कदम जमिपें.. बिछे पडे है ' साप '

नीती का रास्ता अपनाये हो ' आप '
इंतजार मे है सारे डाकू .... लडाकू
बैचैन हे सारे लेंगे आपका ' नाप '

लोकतंत्र मे नया मोड लाये 'आप '
बरसो तक चल रहा था सबका
सत्ता संपत्ती के लिये बडा ' पाप '

...तुषार नातू !

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

सावर रे कृष्णा !

सावर रे कृष्णा !

विकारांचे जालीम रेशमी पाश 
आत्म्याचे शोषणही सावकाश 
नको रे कृष्णा आता सर्वनाश 
चित्त बनते आत्म्याचा फास

नोटा कोऱ्या करकरीत कडक
सोन्याची पिवळीधम्म चमक
हिऱ्यांच्या लकाकीची झलक
संपत्ती सत्तेचा मोठा वचक

लटक्या नजरा उन्नत उभार
उठावदार वळणे जिवाला भार
गुप्त कटाक्षांचा गुन्हा वारंवार
सावर कृष्णा झालोय बेजार

क्रोधाचा यज्ञ नजरेतील जाळ
काळीज काहिली खुनशी फाळ
तीळपापड मनाचा किती काळ
कशी जोडली विनाशाशी नाळ

मी मला माझे मायेचेच ओझे
जपतोय कधीचा शिरावर बोजे
ताठा गर्व उन्मादाचीच ही बीजे
होते रे कृष्णा माणूसपण खुजे

...तुषार नातू !

जोकपाल

जोकपाल

अण्णांची जोकपालला पसंती
कोणती असावी त्यांची नीती
अशी तडजोड कशाची पावती ?
की उपोषणाची संपली महती ?

निदान मिळेल चोराची लंगोटी
बंद होतील काहीतरी कामे खोटी
धरणार का सीबीआयची बखोटी ?
प्रधानमंत्र्याला का नको हाकाटी ?

....तुषार नातू !

प्राणत्याग !


' आप ' च्या दिल्लीत आलेल्या सुनामीने 
राजकारणी सगळे चिंतीत..हैराण परेशान 
कसे थोपवावे वादळ ..आले चर्चेला उधाण 

बैठका दिग्गजांच्या वारंवार झडू लागल्या 
लोकपाल लागू करणे हा पर्याय पुढे आला 
देवू सध्या लोकपाल .. नंतर काढूनही घेवू 

पंजाच्या गोटात आरोप प्रत्यारोपही झाले
माकडचाळे करणारे जरा वेळ शांत बसले
नवीन कुरापतीसाठी विचार करू लागले

कमळाने जरी सारेच आलबेल दाखवले
वल्लभभाई पटेल आता तारतील वाटले
नमोंचे महत्व आणखीनच वाढवू म्हंटले

तिसऱ्या मोर्चाने नौकेला किनाऱ्याला नेले
नवे शीड बांधायला घेवून नावाडी बदलले
पाच सहा नावाडी एकदम सागराला भिडले

२०१४ पूर्वी एखाद्या जेष्ठ केंद्रीय नेत्याने
प्राणत्याग केला पाहिजे असेही सुचवले
मरणार कोण ? कशी मिळणार सहानुभूती ?

प्रश्न मोठा पडला ..प्राणत्यागाला कोणीही
तयार नाही झाला ..शेवटी गुप्त खलबते
कळेलच आता कोण अपघाताने मरते ते

...तुषार नातू !

शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

सत्तेची चाहूल ..

सत्तेची चाहूल .. 
उन्मत्त पणाची झूल ...
पडली जगजेत्त्याची भूल ...
मार्गातले खडतर अदृश्य शूल ..
कसे पार करेल रांगते नवखे मूल...
नम्रतेचा अविरत अखंड वसा...
जिंकेल जनतेचा भरोसा ...
जनमनात राहील ठसा ...
हा मार्ग खासा ...

... तुषार नातू !

बुधवार, ४ डिसेंबर, २०१३

झुंडशाही !

अस्मितेच्या बाता व विद्रोहाच्या वल्गना 
ऐकायला जमलेला जनसागर न्याहाळत 
तो मनोमन हरखला स्वतःवर खुश झाला 
त्याच्यात संचारले समस्त सुधारकांचे बळ 

जाती धर्मांच्या भिंतींवर तो खूप करवादला 
कर्कश्य भुंकला ..थुंकला अनेकदा शिंकला 
आवाजाला धार चढली होती परिवर्तनाची 
देवांना ललकारत मोठा हल्ला केला श्रद्धेवर

पूर्वजांची पुण्याई पणाला लावली स्वतःला
सिद्ध करण्यास अन नाकर्तेपण लपवण्यास
समानतेचा नारा देत बंडाचे निशाण रोवले
वेळप्रसंगी जातीच्या आड देखील लपला

सभा संपल्यावर प्रसन्न मनाने बंगल्यावर
पार्टीला गेला ..साहेबांचा आशीर्वाद घेतला
लोकसभेचे तिकीट अन मंत्रिपद पक्के केले
कार्यकर्त्यांना त्याने स्वखर्चाने दारू पाजली

घरी जाताच लगेच देवाच्या पाया पडला
उद्याच्या साम्राज्याची ग्वाही मागितली
लोकशाहीतल्या झुंडशाहीवर प्रसन्न होत
उद्याचा थोर नेता दोन पेग मारून झोपला

..तुषार नातू !