शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

कभी इधर का कभी उधर काचाहे उधर का हो ..या इधर का 
दंगे में खून इंसानो का बहाया 
धर्म जाती के नाम पर हमने 
किसी माँ बहेन को है रुलाया !

गुंडोका एकही धर्म है लुटपाट
होंगे कभी इस नेता के साथ 
कभी होंगे उस नेता के हाथ
आवो देंगे इंसानियत का साथ !

तुषार नातू !

वळवळणारा किडा !माझ्या डोक्यात सतत वळवळणारा किडा 
तुमच्याही डोक्यात असतो का ?
ठेचला तरी पुन्हा जिवंत होऊन वळवळतो 
अन ..सारखा अवस्थ ठेवतो का ?

समस्त घोटाळ्यांच्या मुळाशी जावून 
तो सीबीआय वर थुंकतो का ?
उठसुठ क्लीनचीट देणाऱ्या समित्यांवर 
मनातल्या मनात भुंकतो का ?

फाईल गहाळ झाल्या ..सांगणाऱ्याच्या 
तशरिफ वर लाथ घालतो का ?
आदर्शच्या फाईल जाळून साळसूद 
फिरणाऱ्याना ओळखतो का ?

समानतेच्या गप्पा करत तुझा -माझा 
करणाऱ्यांची कानशिले झोडतो का ?
जातीयवाद कलंक असे बोंबलत 
जातीसाठी माती.. खातो का ?

पुरोगामी -प्रतिगामी भेद मनात जपत 
वाट्टेल ते बरळतो का ?
माझा तो बाळ्या त्याचे मात्र कार्टे
सदा सर्वदा म्हणतो का ?

सावरकर ..आंबेडकर ..शिवाजींच्या
नावाने.. गुर्मीत जगतो का ?
सत्ता ..संपत्ती ..आणि अधिकारांसाठी 
जनतेची वाटणी करतो का ?

स्वतःवरच सारखा खुश राहून डोळ्यावर 
झापडे बांधतो का ?
बंधुत्वाचे निर्लज्ज कातडे पांघरून नेहमी 
रक्तलांच्छित स्वप्ने पाहतो का ? 

तुषार नातू !

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

अनुभूती स्वैरपणाची !पहिला पेग ... छान बर्फ ..सोडा टाकून 
दिमाखात उतरतो घश्याखाली 
घोटा घोटाने ..जिभेचे चोचले पुरवीत 
तरल बुद्धिमत्तेचा साक्षात्कार 
जगातील सर्व समस्यांवर 
भाष्य करण्याचा अधिकार प्रदान करत 

गझलेच्या मंद स्वरांना दाद देत
रसिकतेची ग्वाही भरत
कल्पकतेच्या पंखांनी विहार करत
सर्व समस्या चुटकी इतक्या शुल्लक
क्षुद्र ..फालतू भासवत
' मी ' पणाचा ताठा मिरवत

दुसऱ्या पेगात ..सळसळते रक्त
जोश ..उन्माद नसानसातून फिरवत
आतून खोल विकारांना जागवत
प्रणयाचे रंग हृदयात भरत
क्रोधाचा अग्नी चेतवत
अहंकार इंग्रजीतून प्रकटतो

अनावर भावनांचा महापूर
स्वतःला सिद्ध करण्याचा..
बाकी तुच्छ ..हा अट्टाहास शिगेला
आरोपांच मोहक जाळे..कल्लोळ
उपेक्षितपणचा ताशा
जगाला फुकटचा तमाशा

तिसरा पेग मात्र शिथिल करतो
गात्रे .. उपहासाची फोडणी
तडतडते ..जीभ अडखळू लागते
धूसर स्वप्ने.. वाकुल्या दाखवतात
समस्यांचा बागुलबुवा
तरी ' मी ' चे तुणतुणे टिपेला

हरवलेल्या गोष्टींचा शोक
गमावलेल्या संधींचा गहिवर
हतबलतेची ..असहाय जाणीव
कुरतडणारी खंत .. जुने दीर्घ सल
वैफल्याचे उत्सव ..जड श्वास
बेहोशीचा सुस्त निश्वास !

..तुषार नातू .

( ' पेग ' ची संख्या व्यक्ती सापेक्ष असू शकते )

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

उपरवाले की लाठी

उपरवाले की लाठी आवाज नही करती 
जब सौ पुरे हो जाये तो देर नही करती 

इज्जत ,शोहरत की परवाह नही करती 
धन दौलत से वो बिल्कुल नही डरती 

उतर जाते है नकाब, औकात खोल देती 
विकारो के पाश..भोगो का हिसाब लेती 

हैवानियात की सारी नींव वो उखाड देती
अहंकार के अंधेपन की आंखे तब खुलती

....तुषार नातू

रविवार, १ सप्टेंबर, २०१३

मोर्चेबांधणी !

मोर्चेबांधणी !

पाक फौजा भले येवू दे .....जवानांचे शीर नेवू दे 
युद्धाची ललकारी देवू दे ...अश्रुंचेहही पाट वाहू दे 

मख्ख चेहरा, मठ्ठा भाव .. त्यावरी माशी बसू दे 
कमळ दिल्लीत नको ..हीच मोर्चे बांधणी असू दे 

सहकारी दल नाराज होतील ..भीती त्याची नसू दे 
सी .बी. आय आहेच हाती ..लगेच धाडीचे आदेश दे 

सत्तेचे गणित हाच हेतू ...असेच मनावर ठसु दे
जवान शहीद होतील जरी ..संसद आपलीच होऊ दे

...तुषार नातू

गुलाम

स्वतःला मी रोज ...आठवण करून देतो 
मी गुलाम आहे ....असे सारखे बजावतो 

मग मी सलाम .....करायला तयार होतो 
सगळीकडे सर्वदा.. मान झुकवून बोलतो 

विद्रोहाच्या बाता करताना.. सावध राहतो 
कोणी ऐकत नाही याची खात्री करून घेतो 

मनातील एके ४७, RDXचे साठे तपासतो 
एकदाच स्फोट करीन म्हणत झोपी जातो

सकाळी पुन्हा..... घाण्याला जुंपून घेतो
पोरांचे भविष्य म्हणत... बुद्धिभेद करतो

क्रांतीचे गीत गात .....लाचारीने जगतो
स्वतची पाठ थोपटूत...साफल्य शोधतो

.......तुषार नातू !

डाकुंचे अधिवेशन !

डाकुंचे अधिवेशन !

संसदेत डाकुंचे अधिवेशन भरले 
स्वकल्याणाचे हेतू बाळगून 
जनप्रतिनिधी सारे एकत्र जमले 

पगारवाढीचे जे विधेयक आले 
विनातक्रार ,बिनविरोध 
लगेच सर्वांनी मंजूरही केले 

RTI मधून मुक्त होऊ म्हणाले
यावरही त्यांचे एकमत
स्वतःला लगेच संरक्षित केले

सुप्रीमकोर्टाच्या आदेशावर चिडले
पोटतिडकीने भाषण त्यांचे
गुन्हेगारांनाही निवडून द्या म्हणाले

जनकल्याणाचे विधेयक आले
आरोप प्रत्यारोपात दाबले
त्रुटी..सुधारणात दडपून टाकले

दरोड्याचे नवीन प्लान झाले
देशप्रेमाच्या प्रदर्शनाने
अधिवेशनाचे एकदाचे सूप वाजले !

...तुषार नातू !

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजण्याआधीच 
ब्रिटीश देशातून चंबू गबाळे ..गुंडाळतानाच 
बलिदानाचे घाव .. अश्रू आटण्यापूर्वीच 
एकतेचा नारा मनामनात ठसण्याआधीच 

ते जाती धर्माचे मोर्चे उघडून ..सरसावले 
देशबांधवांच्या सेवेचे ......कातडे पांघरले 
सत्तेच्या उपभोगास तयार होऊन बसले 
दुहीचे बीज इंग्रजांकडून आयतेच मिळाले 

सगळीकडे पेरून ..छान मशागत करून
संधिसाधू सज्ज आपापली शस्त्रे परजून
देशप्रेमाचा फुटबॉल.. खेळू टीम बनवून
खुर्चीचा गोल करू जनतेला साक्ष ठेवून

...तुषार नातू !

'अमर रहे '

'अमर रहे ' च्या जयघोषात ..तत्वे विलीन झाली 
वादाला तोंड फुटले ..व्यथित मने कलुषित झाली 

नवा पत्ता .. हुकमी सत्ता ..पोळी शेकली गेली 
सुरक्षेच्या घेऱ्यात बसून .. ठिणगी हवेत फेकली 

वणवा पेटणार अशीच बेगमी......कोणी बरे केली ?

हा की तो ..तो नव्हे हाच ..अंधारात तिरंदाजी झाली.
माझाच नेम अचूक अशी ..वल्गनाही करून झाली 

स्वप्नाची राखरांगोळी ..कोणाची इमारत उभी राहिली ?
मूक आक्रोशाच्या मनात ..लोकशाही कोमेजून गेली

तुषार नातू !

प्रिय कृष्णा !

प्रिय कृष्णा !

' संभवामि युगे युगे ' आश्वासन देवून 
तूच निर्मिलीस मनामनात 
हिस्त्र श्वापदांची ..अनादी ..अदिम टोळी 
सत्ता ..संपत्ती ..भोगांची अभेद्य जाळी

विवेकाचा लगाम स्वतच्या हाती ठेवून 
दिलेस आम्हाला बुद्धीचे काटेरी वरदान
तुझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावण्याचे 
मोहक ...मायावी ..बुद्धिनिष्ठ तत्वज्ञान

कौरवसेना रणांगणात ..निश्चयी ठाम
अर्जूनांचे मात्र.. हरपलेले भान
विषाद..वैफल्याचे ..सर्वत्र घमासान
तुझ्याच साक्षीने ..अघोरी शिरकाण

तुझ्या आश्वासनावर विसंबून आम्ही
बेबंद ..बेभान ..
अस्तित्व तुझे.. मात्र निर्गुण निराकार ...
शोधताना ..माझी जेव्हा जेव्हा हार
टांगा पलटी..अन ..घोडे फरार

..तुषार नातू !

इट्स ऑल !

न्यायधीश महोदय !

सदर आरोपी हा अल्पवयीन आहे 
केवळ मित्रांच्या चिथावणी वरून 
शरीराने जरी बाप होण्यास लायक
झाल असला तरी ..
तो नाबलिग आहे .. अज्ञानी आहे 

काय करायचे ..कसे करायचे सारे 
त्याला माहित आहे ..पण महोदय 
त्याची मिसरूड कोवळी आहे हो
जरी डोक्याने पिकला असला
तरी वयाने मात्र लहानच

तो लहान होता म्हणूनच अबला
त्याच्यावर विश्वासली होती
त्याच्या चेहऱ्याला भुलून मूर्ख
दैत्यांच्या बसमध्ये चढली होती
दोष तिचाच आहे मायबाप


युवर ऑनर...
तिचा तो मारखावू मित्र देखील
तितकाच दोषी म्हणायचा
इतके हिंदी सिनेमे पाहूनही
त्याला व्हिलनला मारता आले
नाही ..हा मोठाच गुन्हा

ही जोडी बसमध्ये चढलीच
नसती तर ..तर हे सारे
हतबल झाले असते सरकार
निमूट मंदिरात भजन
करत बसले असते

देशात दारूबंदी असती तर
दारूही प्यायले नसत बिचारे
न तिचा मुडदाही पडला नसता
स्वतच्या बचावासाठी
त्यांनी तिचा खून केला ..

खून कसला .. तिला सोडवले
त्यांनी लज्जा हरणाच्या
मरण यातनेतून .. लोकांच्या
वासानामयी नजरातून..
फक्त जरा निर्घुण वागले हो

हा मोठा गुन्हा होऊ शकत नाही
बिच्यार्यांचे म्हातारे आईबाप आहेत
आईबापानी संस्कार दिले नसतील
मात्र त्याच्या सगळ्या आशा
यांच्यावरच निर्भर

तेव्हा युवर ऑनर माझा युक्तिवाद
समजून घ्या .. माणुसकीच्या नजरेने
यांना निर्दोष सोडून द्या
खटला भरा तिच्या मित्रावर
मैत्रिणीचे रक्षण केले नाही म्हणून

इट्स ऑल !

- तुषार नातू