रविवार, १ सप्टेंबर, २०१३

इट्स ऑल !

न्यायधीश महोदय !

सदर आरोपी हा अल्पवयीन आहे 
केवळ मित्रांच्या चिथावणी वरून 
शरीराने जरी बाप होण्यास लायक
झाल असला तरी ..
तो नाबलिग आहे .. अज्ञानी आहे 

काय करायचे ..कसे करायचे सारे 
त्याला माहित आहे ..पण महोदय 
त्याची मिसरूड कोवळी आहे हो
जरी डोक्याने पिकला असला
तरी वयाने मात्र लहानच

तो लहान होता म्हणूनच अबला
त्याच्यावर विश्वासली होती
त्याच्या चेहऱ्याला भुलून मूर्ख
दैत्यांच्या बसमध्ये चढली होती
दोष तिचाच आहे मायबाप


युवर ऑनर...
तिचा तो मारखावू मित्र देखील
तितकाच दोषी म्हणायचा
इतके हिंदी सिनेमे पाहूनही
त्याला व्हिलनला मारता आले
नाही ..हा मोठाच गुन्हा

ही जोडी बसमध्ये चढलीच
नसती तर ..तर हे सारे
हतबल झाले असते सरकार
निमूट मंदिरात भजन
करत बसले असते

देशात दारूबंदी असती तर
दारूही प्यायले नसत बिचारे
न तिचा मुडदाही पडला नसता
स्वतच्या बचावासाठी
त्यांनी तिचा खून केला ..

खून कसला .. तिला सोडवले
त्यांनी लज्जा हरणाच्या
मरण यातनेतून .. लोकांच्या
वासानामयी नजरातून..
फक्त जरा निर्घुण वागले हो

हा मोठा गुन्हा होऊ शकत नाही
बिच्यार्यांचे म्हातारे आईबाप आहेत
आईबापानी संस्कार दिले नसतील
मात्र त्याच्या सगळ्या आशा
यांच्यावरच निर्भर

तेव्हा युवर ऑनर माझा युक्तिवाद
समजून घ्या .. माणुसकीच्या नजरेने
यांना निर्दोष सोडून द्या
खटला भरा तिच्या मित्रावर
मैत्रिणीचे रक्षण केले नाही म्हणून

इट्स ऑल !

- तुषार नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा