माझ्या डोक्यात सतत वळवळणारा किडा
तुमच्याही डोक्यात असतो का ?
ठेचला तरी पुन्हा जिवंत होऊन वळवळतो
अन ..सारखा अवस्थ ठेवतो का ?
समस्त घोटाळ्यांच्या मुळाशी जावून
तो सीबीआय वर थुंकतो का ?
उठसुठ क्लीनचीट देणाऱ्या समित्यांवर
मनातल्या मनात भुंकतो का ?
फाईल गहाळ झाल्या ..सांगणाऱ्याच्या
तशरिफ वर लाथ घालतो का ?
आदर्शच्या फाईल जाळून साळसूद
फिरणाऱ्याना ओळखतो का ?
समानतेच्या गप्पा करत तुझा -माझा
करणाऱ्यांची कानशिले झोडतो का ?
जातीयवाद कलंक असे बोंबलत
जातीसाठी माती.. खातो का ?
पुरोगामी -प्रतिगामी भेद मनात जपत
वाट्टेल ते बरळतो का ?
माझा तो बाळ्या त्याचे मात्र कार्टे
सदा सर्वदा म्हणतो का ?
सावरकर ..आंबेडकर ..शिवाजींच्या
नावाने.. गुर्मीत जगतो का ?
सत्ता ..संपत्ती ..आणि अधिकारांसाठी
जनतेची वाटणी करतो का ?
स्वतःवरच सारखा खुश राहून डोळ्यावर
झापडे बांधतो का ?
बंधुत्वाचे निर्लज्ज कातडे पांघरून नेहमी
रक्तलांच्छित स्वप्ने पाहतो का ?
तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा