सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

विकले इमान त्यांनी

विकले इमान त्यांनी.. नेहमीच पैश्यासाठी 
पसरलेले हात त्यांचे... दावेदारी पैश्यांसाठी 

मनात त्यांच्या लबाडी. भलतीच पैश्यांसाठी 
जनात दावे मोठे मात्र ..करामती पैश्यांसाठी 
कपडे पांढरेशुभ्र त्यांचे कृष्णकृत्ये पैश्यांसाठी 
घेती शपथा खोट्या .भीष्मप्रतिज्ञा पैश्यांसाठी 

उसने हसू मुद्रेवरी ते .कुटील कामे पैश्यांसाठी
सेवेचे नाटक त्यांचे उठाठेव सगळी पैश्यांसाठी 
आभाळभर अतृप्ती त्यांची तगमग पैश्यासाठी
नातीगोती सोयरे सारे.... .जमवले पैश्यांसाठी

.....तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा