सोमवार, २६ मे, २०१४

पराभवाचे चिंतन ..खोटे आत्ममंथन

पराभवाचे चिंतन ..खोटे आत्ममंथन 

मतपेटीतून व्यक्त झाला आक्रोश जनतेचा 
मंथन सुरु झाले चोरांचे वेध घेवू पराभवाचा 

नैतिकतेचा आव आणून नितीश बसले घरी 
जनता भ्रमित झाली या उलट्या बोंबा मारी 

गंजलेल्या सेक्युलरीझमला आणू झळाळी 
पुढच्या वेळी पुन्हा मग भाजू आपली पोळी 

नेहमीप्रमाणे मायावतींनी कागदच वाचला
धर्मांधतेवर दोष टाकत जातीयवाद जपला

सोनियाचा भाव पडला राहुलही गेला रद्दीत
प्रियांकाला पुढे करा जगूया नव्या लाचारीत

मोदी लहर की जनतेचा रोष कळेना कुणाला
महागाई बेरोजगार अन भ्रष्टाचार वैरी झाला

अहंकार नडलाय झाला पराभव उन्मत्तांचा
नैतिकतेचा आव नको विचार करा जनतेचा

..तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा