मी पक्का समाजवादी आहे याबाबत संशयच नको
बंगल्याची प्रत्येक वीट मी समाजवादावर भाजलीय
सिमेंट देखील मी समाजाच्याच पैशाने घेतलेय की
आणी हो ..बंगल्याची जागा आणि फार्महाउस सुद्धा
समाजा कडूनच घेतलेय हट्टाने त्यासाठी भले मला
कागदपत्रे बदलावी लागली ..मात्र समाजवाद हवाच
आपला परका असा भेद न करता मी मुलांना पण
परदेशात शिकायला ठेवले होते .इतकेच नव्हे तर
बंगल्यावरची कुत्री सुद्धा भेदभाव करता .परदेशीच
येता जाता समाजवाद उगाळून ..अंगी भिनवलाय
माझी सारी सत्ता याच समाजवादावर मिळवलीय
मुले बाळे याच समाजवादावर मोठी होणार आहेत
समाजवादी म्हणजे काय तर अगदी सोपे आहे हो
समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मी तुझा आहे हे
भासवायचे ..जमेल त्याला नडायचे जमले नाही
तर त्याला कम्युनल ठरवायचे मंदिरापेक्षा जास्त
वेळा मशिदीत जायचे बहुधा गोल टोपी घालायची
विरोधकांना जातीयवादी म्हणायचे ..बस इतकेच
...तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा