शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

' मी ' चे सुरक्षा कवच !


स्वतःच्या आत ..खोल खोल जातांना
अंधाऱ्या गुहेत ....शोधक डोकावतांना
जाणिवांचा डोह ..खळबळून काढतांना
अडवेल नेहमी ..' मी ' चे सुरक्षा कवच
स्वार्थाचे उत्सव ....खंगाळून पाहताना
गर्वाचे पापुद्रे काढ ..निरक्षण करतांना
मला.. माझेचे ........समर्थन करताना
काढावेच लागेल ..' मी 'चे सुरक्षा कवच
तुषार नातू !

आनंदोत्सव !


कधीही ..कोणत्याही मार्गाने ...कुठल्याही क्षणी
नकळत .. बेसावध ....अकस्मित.....अपघाताने
क्रूर ..निर्घृण ..दुष्ट ..पाषाण हृदयी ..हृदयद्रावक
काळ घाला घालणार .आपला श्वास बंद पडणार
हृदयाची धडधड थांबणार ..सर्व गरजा संपणार
सर्व काही सोडून .....,अनंताचा अपरिहार्य प्रवास
याची सतत जाणीव हवी...मग जगणे सोपे होते
आनंदाचे क्षण देता घेता येतात......निरपेक्षपणे
अहंकार गळतो ..स्वार्थ पळतो ..विकार ढळतो
दया ..करुणा ..न्याय ..समानता ..उदयास येते !

थर्टी फर्स्ट !


नववर्षाच्या..स्वागताच्या निमित्ताने
ठरतील बेत पार्टीचे....उसन्या कैफाचे
सरत्या वर्ष जल्लोषात ...धुंद होण्याचे
स्वतःला वाचव रे ..जमेल तुला नक्की
अनेक पाहिलेत मी .हा जल्लोष नंतरही
आयुष्यभर सोबत घेवून गुलाम होतांना
फेसाळत्या प्याल्यात.....शहीद होताना
स्वतःला वाचव रे ...जमेल तुला नक्की
तू पार्टीला जा हवे तर ..मस्त जेवण कर
थोडे नाचगाणेही चालेल मस्ती करताना
पण नाचण्यासाठी दारू हा मूर्खपणा नको
स्वतःला वाचव रे ....जमेल तुला नक्की
मुलाबाळांसमोर पुढारलेपण दाखवू नको
त्यांच्या साक्षीने चिअर्स नकोच अजिबात
उलट त्यांना दिशा मिळेल..भरकटण्याची
वाचव रे स्वतःला ....जमेल तुला नक्की
बायकांना देखील..बियरचा आग्रह नको
हा फालतू पुरोगामीपणा दाखवू नकोस
लक्षात ठेव यात काही...शहाणपण नाही
वाचव रे स्वतःला ....जमेल तुला नक्की
एक काम कर .....सिनेमा नाटकाला जा
छान निसर्गात..चांदण्यात फिरायला जा
नवे संकल्प करताना..शुद्धीवर हवास तू
वाचव रे स्वतःला ...जमेल तुला नक्की !
......तुषार नातू ( १६ डिसेंबर १४ . )

विद्रोही !


चंद्रावरही......,....धार मारूनी
सूर्यावरती... छान जुलाब करु
रोखाल कैसे......आम्हा तुम्ही
आम्ही नव्या युगाचे वाटसरू !
पोथी पुराण....रद्दीत विकोनी
आमचेच अनोखे...ग्रंथ लिहू
बोंब ठोकुनी...,गीत क्रांतीचे
प्रत्येकाच्या....ओठावर पेरू
योगशास्त्र....जोतीष पुरातन
अध्यात्म ते..फाटयावर मारू
येताजाता ....शिव्या घालोनी
साहित्याचीही ....शुद्धि करू
रक्तरंजीत विलास ...आमुचा
हक्क सारे....ओरबाडून घेवू
वाढते आहे संख्या ..आमची
आम्हीच आता ...राज्य करू !
( गंमत विडंबन )
...तुषार नातू !

आग !


सहेतुक रोखून पाहिले की .....तक्रार करा
सहेतुक धक्का दिला की......तक्रार करा
सहेतुक स्पर्श केला की ......सावध व्हा
सहेतुक की निर्हेतूक,....हे ठरवण्यात
बहूतेक उभी हयात जाते अनेकींची
तक्रार देतांना पुन्हा सहेतूक प्रश्न
निर्हेतूक भासणारे नजरेचे चटके
उगाच डोक्याला ताप म्हणणारे
आप्त..स्वकीय..नवरा..बापही
बये ..सबला व्हावे तुच आता
तुझ्या या अखंड लढाईस ..
काही विशेष नको करु
तुझ्या नजरेत वाढव
ठिणग्या..निखारे..
ज्वालामुखी !
हे लोक आगीला घाबरतात नेहमीच !

काय ठरले मग ?


काय मग ? काय प्रोग्राम ३१ चा ?
धुंदीत संकल्प करणार नववर्षाचे
की शुद्धीवर राहून जाणीव पूर्वक 
बेत आखणार सोनेरी भविष्याचे ?
मादक द्रव्यांच्या आवरणाखाली
मेंदूला.... झिणझिण्या आणणार
की आत्म्याच्या सहवासात राहून
शोध.... हरवलेल्या माणुसकीचा ?
हर्षोल्हास मस्त...हजारो खर्चून
हॉटेल..पब...पार्टीला...आवर्जून
की ताळेबंद मांडणार स्वतःचा
उज्ज्वल उद्याच्या पहाटेसाठी ?
आपल्या यशाच्या मत्त गुर्मीत
पाठ थोपटणार स्वतःची सतत
की करोडो दुर्दैवी दिन दुबळ्यांना
शक्ती मिळावी या साठी प्रार्थना ?
बळी तो कान पिळी मंत्र जपत
स्वतःचे समर्थन करत राहणार
की स्वतःला तत्वांच्या कोर्टात
उभे करून....निपक्ष न्यायदान ?
माझे पैसे .मी खर्च करणारच
माझ्या मर्जीने..माझ्यासाठी
की सामाजिक भान...जागवून
आत्मिक उन्नतीला खतपाणी ?
थंडीत...फुटपाथवर कुडकुडणारे
नापिकीने मृत्यूला कवटाळणारे
थर्टीफर्स्टच्या जल्लोष करतांना
आठवतील का ? किमान एकदा ?
की साला पार्टीला गालबोट लावले
याने म्हणत तोंड वाकडे करणार ?
....तुषार नातू ( २९ डिसेम्बर २०१४ )

उत्तम परीक्षक !


समानतेच्या गप्पा मारताना ..
स्वत: ची जात..धर्म..पंथ
विसरता आलेच पाहिजे
अन्यायाचा राग असेल तर
स्वत: करत असलेले न्याय
तपासले पाहिजेत रोज रोज
ईतरांची चुक शोधतांनाही
स्वत: केलेल्या चुका पण
आठवता आल्या पाहिजेत
दिन ..दु:खी ,गरीबां बद्दल
आस्था दाखवत असाल
तर ह्रुदयापासुनच हवी
आपण चा'गले अभिनेते
असलो तरी... निसर्गही
उत्तम परीक्षक असतो !