शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

थर्टी फर्स्ट !


नववर्षाच्या..स्वागताच्या निमित्ताने
ठरतील बेत पार्टीचे....उसन्या कैफाचे
सरत्या वर्ष जल्लोषात ...धुंद होण्याचे
स्वतःला वाचव रे ..जमेल तुला नक्की
अनेक पाहिलेत मी .हा जल्लोष नंतरही
आयुष्यभर सोबत घेवून गुलाम होतांना
फेसाळत्या प्याल्यात.....शहीद होताना
स्वतःला वाचव रे ...जमेल तुला नक्की
तू पार्टीला जा हवे तर ..मस्त जेवण कर
थोडे नाचगाणेही चालेल मस्ती करताना
पण नाचण्यासाठी दारू हा मूर्खपणा नको
स्वतःला वाचव रे ....जमेल तुला नक्की
मुलाबाळांसमोर पुढारलेपण दाखवू नको
त्यांच्या साक्षीने चिअर्स नकोच अजिबात
उलट त्यांना दिशा मिळेल..भरकटण्याची
वाचव रे स्वतःला ....जमेल तुला नक्की
बायकांना देखील..बियरचा आग्रह नको
हा फालतू पुरोगामीपणा दाखवू नकोस
लक्षात ठेव यात काही...शहाणपण नाही
वाचव रे स्वतःला ....जमेल तुला नक्की
एक काम कर .....सिनेमा नाटकाला जा
छान निसर्गात..चांदण्यात फिरायला जा
नवे संकल्प करताना..शुद्धीवर हवास तू
वाचव रे स्वतःला ...जमेल तुला नक्की !
......तुषार नातू ( १६ डिसेंबर १४ . )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा