शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

मनाच्या तळघरात थेट ..खोल .....!


जाती धर्माच्या ..शिक्षणाच्या ..संस्कृतीच्या
स्थावर जंगम मालमत्तेच्या ..बौद्धिकतेच्या
मानसन्मानाच्या....अस्मितांना बगल देवून 
एकदा उतरावे मनाच्या तळघरात..थेट खोल
चकाकदार यशाचे मापदंड .सत्कारांचे उत्सव
कर्तुत्वाचे कळस ..संघर्षाचे धागेदोरे ..प्रतिष्ठा
सुरवातीलाच आडवे येतील.....त्यांना चुकवून
बेधडक पुढे जा ..मनाच्या तळघरात थेट खोल
जाणिवांचे जाळे..भावनांचे चक्रव्यूह ..अनिवार्य
मनाशी जपलेल्या स्वप्नांचे....उध्वस्त अवशेष
अतृप्तीचे कॅक्टस ...दडपलेले अनौरस सुस्कारे
घाबरवतील..तरी पुढे जात रहा तळघरात खोल
दुर्गंधी....किळस ..घृणा....यांच्याही पलीकडे जा
अनिर्बंध इच्छांच्या श्वापदांचे जीवघेणे आक्रोश
पुढे जात राहा ..शोध सुरु ठेव सातत्याने अथक
नक्की सापडेल.पराभूत..परागंदा आत्मा तुझा
...तुषार नातू ! ( १४ जाने २०१५ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा