शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

फेसबुक !

कधीही कोणी इथे नाही सुस्त
असंख्य मनांची अधिर गस्त
नसतो ईथे अपडेटसचा अस्त
जो तो आहे स्वत: मध्ये मस्त
जातीधर्माचे अवस्थ हाकारे
संस्क्रुतिचे बिनपगारी पहारे
धर्मद्वेषाचे धगधगते निखारे
जातींचे वाभाडे रान पेटवणारे
अभिनंदन , शूभकामना अन
धिक्कारांचे जाग्रुत चित्कार
चिमटे , गूद्दे , जोरकस प्रहार
मुद्दा धरुन ठेवणारे जाणकार
जखमी आशिक प्रेमी नवथर
नवयौवनांचे बेसावध पदर
हाय हेलोचे टपलेले धनुर्धर
अन चाचपणारे निर्लज्ज पंटर
प्रेमीजनांना इथलाच आधार
फेक खात्यांचे इथेच आगार
मूर्ख..निरागस ..माहीतगार
ईथेच आहेत विविध प्रकार
....तुषार नातु !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा