शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

आग !


सहेतुक रोखून पाहिले की .....तक्रार करा
सहेतुक धक्का दिला की......तक्रार करा
सहेतुक स्पर्श केला की ......सावध व्हा
सहेतुक की निर्हेतूक,....हे ठरवण्यात
बहूतेक उभी हयात जाते अनेकींची
तक्रार देतांना पुन्हा सहेतूक प्रश्न
निर्हेतूक भासणारे नजरेचे चटके
उगाच डोक्याला ताप म्हणणारे
आप्त..स्वकीय..नवरा..बापही
बये ..सबला व्हावे तुच आता
तुझ्या या अखंड लढाईस ..
काही विशेष नको करु
तुझ्या नजरेत वाढव
ठिणग्या..निखारे..
ज्वालामुखी !
हे लोक आगीला घाबरतात नेहमीच !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा