शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

उसन्या श्वासांवर !



उसन्या श्वासांवर ..विलंबित आश्वासनांवर 
मनाचा वारू ....स्वप्नभंगाच्या हिंदोळ्यांवर 
इतिहासजमा संदर्भ ..वर्तमानाच्या ऐरणीवर 
काळोखाची सावली ..उगवतीच्या भविष्यावर 

सोबती सारे निश्चिंत ..हृदयाच्या ठोक्यांवर 
अखंड एकलकोंडे ..विरहस्त मन काट्यांवर 
अज्ञाताचा बागुलबुवा ..सततचा पहाऱ्यावर
दबा धरून जहरी नाग ..ओळखीच्या वाटेवर

...तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा