विचारांचा अथक प्रवास मैलो न मैल
शक्यतांच्या क्षितिजावरील काकदृष्टी
कान आतुर श्वासांच्या शुभावार्तेसाठी
स्वप्नाच्या गावांचेही वांझोटे पुनर्वसन
दाही दिशांना हादरवणारा तृषार्त टाहो
डोळ्यांची भिरभिरणारी विध्द पाखरे
कोणती ही क्षुधा ..मी नेहमीच द्विधा !
...तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा