बुधवार, १४ मे, २०१४

एग्जीट पोल ???


पंजा हो सकता है गंजा
मोदी ने लाया गुजराती मांजा 

सायकिल की सवारी जनता ने नाकारी 
मोदी विकासयात्रा में युपी की भीड भारी 

हाथी की पड गई धीमी चाल बहेना है बेहाल 
मोदी की चालाकीने सबका किया बुरा हाल 

नितीश को मतदाता ने जगह उसकी दिखाई है
गठबंधन को तोड के अपने पैरो पे कुल्हाड़ी मारी है

अम्मा ने बचाई अपनी लाज तामिलनाडू में है आगे
मोदी आये या और कोई अम्माको देख दुश्मन सारे भागे

ममता के सादगी का चक्कर घुसपेठियों का है उनको साथ
कोई लाख कोशिश करे भला ममता नहीं होगी कभी अनाथ

घडी ने हर जगह में भ्रष्टाचार किया अब हो गई है मालामाल
चाचा भतीजे के काले जादू को जनताने किया है अब खस्ताहाल

आप का बड़ा पाप देहली का विश्वासघात नैतिकता के सपने देकर
केजरीवाल का बवाल हवा हो गया मोदी से भिड़े अपनी औकात भूलकर

...तुषार नातू !

शुक्रवार, ९ मे, २०१४

पक्का समाजवादी !



मी पक्का समाजवादी आहे याबाबत संशयच नको 
बंगल्याची प्रत्येक वीट मी समाजवादावर भाजलीय 
सिमेंट देखील मी समाजाच्याच पैशाने घेतलेय की
आणी हो ..बंगल्याची जागा आणि फार्महाउस सुद्धा 
समाजा कडूनच घेतलेय हट्टाने त्यासाठी भले मला 
कागदपत्रे बदलावी लागली ..मात्र समाजवाद हवाच 

आपला परका असा भेद न करता मी मुलांना पण 
परदेशात शिकायला ठेवले होते .इतकेच नव्हे तर
बंगल्यावरची कुत्री सुद्धा भेदभाव करता .परदेशीच
येता जाता समाजवाद उगाळून ..अंगी भिनवलाय
माझी सारी सत्ता याच समाजवादावर मिळवलीय
मुले बाळे याच समाजवादावर मोठी होणार आहेत

समाजवादी म्हणजे काय तर अगदी सोपे आहे हो
समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मी तुझा आहे हे
भासवायचे ..जमेल त्याला नडायचे जमले नाही
तर त्याला कम्युनल ठरवायचे मंदिरापेक्षा जास्त
वेळा मशिदीत जायचे बहुधा गोल टोपी घालायची
विरोधकांना जातीयवादी म्हणायचे ..बस इतकेच

...तुषार नातू !

मनाचा दगड !

मनाचा दगड !

मनाला दगड कर हवे तर ..सगळ्या संवेदना गोठव 
हृदयात खोल भिनलेला .....हिरवा ओलावा आटव
हे असेच जगायचे असते ...हाच संदेश आता पाठव 

पुढे पुढे जात राहायचे .. क्षणाला नव्याने भिडायचे 
आतून कितीही तुटले ...तरी कणाकणाने जोडायचे 
सवय होईल तुलाही मग ...उगा का उसवत जायचे 

जीर्ण शीर्ण स्मृतींचे आता ..एक थडगे बांधायला घे
वर वास्तवाची चादर टाकून ..ते छान सजवायला घे
विस्मृतीचे रोपटे लावून ..ते झाड मोठे करायला घे

...तुषार नातू !

शुक्रवार, २ मे, २०१४

क्षण सोनेरी !

क्षण सोनेरी !

तिला विसरायचे म्हणत..मनाचा कानाकोपरा धुंडाळला 
सारा पसारा काढून मग ...पुन्हा तो आवरायला घेतला 
चुकार काही सोनेरी क्षण ...चिकटलेलेच राहिले मनाला
त्यांचाच आहे दोष सारा ...बिघडला तेथेच सर्व मामला 

तिच्या खळाळत्या हास्याने..चकोर जेव्हा मन झालेले 
निशब्दतेचे शब्दगंध ते ....मनात माझ्या दरवळलेले 
आर्त नजरेचे तिचे इशारे ..मनात खोल तेव्हा रुजलेले 
क्षण सोनेरी तेव्हाचे ते .. राहिले तसेच मनी थिजलेले

.....तुषार !

हिम्मत त्याची गम्मत !

हिम्मत त्याची गम्मत !

तो माझा खाजगी मामला आहे असे म्हणत 
मी माझ्यात सगळी श्वापदे पाळली आहेत 
ती नेमकी शिकार करतात माझ्या शत्रूंची 
त्यांच्या भावनांचे जाहीर लचके तोडतात
जमेल तेव्हा वाभाडे काढतात सर्वांचेच 
माझ्या बाबतीत सौजन्याने वागावे 
मला जरा समजून घ्यावे वगैरे
म्हणत मी सौजन्य शिकवतो 
डोळे मिटून दुध पीत रहातो
हिम्मत त्याची गम्मत
हम करे सो कायदा
सगळाच फायदा

तुषार नातू !

सुखाच्या शोधात

सुखाच्या शोधात मी खूप भटकलो 
फसलो , हसलो ,रुसलो भरकटलो 
कधी धास्तावलो , बहुधा पस्तावलो 
मुखवटे घालून फिरलो न मिरवलो 

चटावलो , भुललो , आतून हललो 
इतरांच्या व्यथेलाच कारण बनलो 
समर्थनाच्या आड नेहमीच लपलो 
दोषारोप करत अनेकांना दुरावलो

माझे ...मला.. म्हणत सुखावलो
त्याचे ...त्याला.. करत डोकावलो
स्वताच्या विचारांवरच विश्वासलो
हरलो ..रडलो ..अनेकदा गुदमरलो

शेवटी मी माझ्याच आत शिरलो
चकित झालो ..अंधारात सापडलो
खोल खोल आत ..धैर्याने घुसलो
स्वतःला सापडलो तेव्हा आनंदलो !

...तुषार नातू !

शनिवार, २६ एप्रिल, २०१४

काळाची हिशेबवही !

काळाची हिशेबवही !

पत्रिका दाखवत ..विविध प्रकारच्या अंगठ्या 
खडे ...माळा घालून स्वतःला सुरक्षित करतो 

जमेल तसे प्रत्येक तीर्थस्थानाला भेटही देतो 
मंदिर मस्जिद चर्च पुढे हळूच माथा झुकवतो 

धर्मस्थळाच्या दानपेटीत पैसे देखील टाकतो 
अभिमानाने मग स्वतःचीच पाठही थोपटतो 

ही अशी सुरक्षा कवचे पांघरून निवांत झोपतो
अन मी निर्भय होतो माझ्या नित्य कर्मासाठी

दिवसभर मग मी माझ्या मनाचा राजा असतो
पैसा मिळवण्यासाठी मी वाट्टेल तसे धंदे करतो

अधिकार गाजवत सर्वांवर मी उन्मत्त जगतो
माझ्या कर्तुत्वाचे सगळीकडे गोडवे मीच गातो

स्वार्थाच्या आड येणाऱ्यांची विल्हेवाट लावतो
कुटील असे क्रूर डाव नेहमीच .. योजून ठेवतो

काळ माझा मात्र सगळे मूकपणे पाहत असतो
माझ्या नकळत तो माझा हिशोब नीटच ठेवतो

वेळ येताच तो आपला फासा नेमकाच टाकतो
मी तडफडतो ..चडफडतो..सगळ्या शक्तीनिशी

शेवटी असहाय अन हतबल होतो शरण जातो
वेळ गेलेली ..काळाचीही हिशोबवही भरलेली

....तुषार नातू !